Contact: +91-9711224068
International Journal of Physical Education, Sports and Health
  • Printed Journal
  • Indexed Journal
  • Refereed Journal
  • Peer Reviewed Journal

P-ISSN: 2394-1685 | E-ISSN: 2394-1693 | CODEN: IJPEJB

2016, Vol. 3, Issue 4, Part D

महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्रयोगशाळा व इतर सोयी सुविधांचेे विश्लेषणात्मक अध्ययन


Author(s): Prakash T Kamble

Abstract:
या प्रस्तुत अध्ययनाचा प्रमुख उद्देश एन.सी.टी.ई. च्या मापदंड व मानकानुसार शारीरिक शिक्षण महाविद्यालया क्रीडात्मक, शैक्षणिक गरजेनुसार आवश्यक विविध विषयांच्या अद्ययावत प्रयोगशाळा इतर सोयी सुविधा व शैक्षणिक दर्जा व उपलब्धतेचा शोध घेणे हा होता. शारीरिक शिक्षणाच्या महाविद्यालयाची सध्यास्थिती लक्षात घेता तेथिल सोयी सुविधांची माहिती घेणे आवश्यक असल्याने. राष्ट्रीय स्तरावर एन.सी.टी.ई. सारख्या संस्थानी विकासात्मक सोयीसुविधा महाविद्यालयाकडे क्रीडात्मक, शैक्षणिक गरजेनुसार असाव्यात यांचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्या निर्देशांचा शारीरिक शिक्षण महाविद्यालयावर पडणारा प्रभाव पाहणे व सदर अध्ययनाच्या माध्यमातून शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा, इतर सोयी सुविधा व शैक्षणिक दर्जा या संबंधीची माहिती प्राप्त झाली असून एन.सी.टी.ई. च्या मापदंड व मानकाची पूर्तता किती महाविद्यालयांनी केली आहे. याची माहिती प्राप्त झाली आहे. या अध्ययनातून महाराष्ट्रातील विविध शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शरीर क्रीया व शरीर विज्ञान संबंधी प्रयोगशाळा, इतर सोयी सुविधा व शैक्षणिक दर्जा उपलब्ध नाही असे दिसून आले आहे. वर्तमान समस्येचा अभ्यास करण्याकरिता संशोधकाने सर्वेक्षण प्रश्नावली पद्धतीचा अवलंब करण्यात आला. याकरिता सन 2011-2015 पर्यत या वर्षात एकूण 106 महाविद्यालयापैकी, दैवनिर्देशन पद्धतीने 80 शारीरिक शिक्षण महाविद्यालयाची निवड करण्यात आली तसेच महाराष्ट्रातील 21 विद्यापीठापैकी अकृषिक 10 विद्यापीठाची निवड करण्यात आली. महाविद्यालयातील 80 प्राचार्य किंवा प्रभारी प्राचार्य, 240 शिक्षक, या प्रमाणे नमुना निवड करुन प्रश्नावली द्वारा माहिती संकलीत करण्यात आली. प्राप्त माहितीचे आधारे सांख्यिकीय विश्लेषण करण्यात आले, सांख्यिकीय विश्लेषणात प्राप्त आकडयांची टक्केवारी काढून त्यांचे सारणी व आलेख तयार करण्यात आले. विविध प्रकारा अंतर्गत विविध घटकांची माहिती ‘काय स्कोअर’ व्दारे काढण्यात आली व सार्थकता स्थर तपासण्यात आला. निष्कर्ष काढण्यात आले. या वरुन असे निष्कर्ष प्राप्त झाले की, महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयात एन.सी.टी.ई. च्या मापदंड व मानका प्रमाणे आवश्यक प्रयोगशाळा, प्रयोगशाळेतील माहिती व तंत्रज्ञानाची उपकरणे, इतर सोयी सुविधा पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नाहीत हे स्पष्ट होते. एन.सी.टी.ई. च्या मापदंड व मानकाचा या घटकात नकारात्मक प्रभाव दिसून आला. या घटकावर पडलेला प्रभाव पडताळला असता बहुतांश महाविद्यालये मापदंड व मानकांची पुर्तता करु शकत नसल्यामुळे आर्थिक दृष्टया, सामाजिक दृष्टया व विकासात्मक दृष्टीकोनातून सक्षम नाहीत. परंतू शरीर क्रीया व शरीर विज्ञान उपकरण व साहित्य अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. या घटकाअंतर्गत सकारात्मक प्रभाव दिसून आला.

Pages: 209-213  |  1661 Views  90 Downloads

Download Full Article: Click Here


International Journal of Physical Education, Sports and Health
How to cite this article:
Prakash T Kamble. महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्रयोगशाळा व इतर सोयी सुविधांचेे विश्लेषणात्मक अध्ययन. Int J Phys Educ Sports Health 2016;3(4):209-213.

Call for book chapter
International Journal of Physical Education, Sports and Health
Journals List Click Here Research Journals Research Journals